Tuesday, October 9, 2007

प्रेमिकेचा प्रेमभंग ...

पुष्पमालेंतील फुलांसम
प्रेम मी गुंफले
तू,
आधाराला दिलेल्या
विश्वासाच्या पाय-यांवर
नि:शंकपणे चढले
आणि आता
त्या पाय-याच तू काढून घेतल्यास
तूच सांग
कडेलोटाशिवाय
दुसरा पर्याय
माझ्यासमोर
उरतोच कुठे?


- सागर

No comments: