तो आला अन्
सपासप
तिच्या हृदयावर घाव घालून
निघून गेला
खेळ अवघा
घडी दो घडीचा
पण
स्वत:चं फाटलेलं हृदय
त्याने केलेला आघात
क्रूरपणे का होईना, पण
त्याने दिलेली निशाणी
सारं....सारं
तिला सांभाळायचं होतं
आणि हो
आणखी एक तिला सांभाळायचं होतं
ज्याच्या खांद्यावर
विश्वासानं मान ठेवली
त्यानंच ती छाटून टाकण्याचं दु:ख ...
- सागर
2 comments:
kiti denger ahe bapre nko vhyla ase
kiti denger ahe bapre nko vhyla ase
Post a Comment