आज मला पौर्णिमेच्या त्या पूर्णचंद्राची,
प्रकर्षाने आठवण येतेय
कारण आपल्या शीतलतेने तो
सर्व धरणी आल्हादित करतो
अन् त्या पूर्णचंद्राची शीतलता
कोणा भाग्यवंताच्या जीवनात
लक्ष्मीची पावलांनी प्रवेश करणार आहे
एका क्षितीजावर सुर्योदय होणार आहे
लक्ष्मी मात्र शांत आहे, उदास आहे
लक्ष्मीच्या तेजात, तिच्या भावना दिसत नाहित
पण गृहप्रवेश करताना, लक्ष्मीने
हसतमुख असावं, प्रसन्न असावं
एकदा गृहप्रवेश केल्यावर मात्र लक्ष्मीने,
आपल्या घराच्या सुखसमृद्धीचाच ध्यास घ्यावा
मेणबत्ती स्वत:जळून प्रकाश देते
चंद्र न जळता प्रकाश देतो
हे लक्ष्मीनंच ठरवायचं की,
प्रकाश मेणबत्तीसारखा द्यायचा की चंद्रासारखा?
- सागर
1 comment:
chan ahe
Post a Comment