मावळत्या सूर्यानंतर
उगवता सूर्य
रंगीबेरंगी, प्रसन्न अशी
पहाट घेऊन येत असतो
केवळ याच भरंवशावर
राहीलो मी
अन् त्याचमुळे
आज मला जटायू पक्ष्याप्रमाणे
हतबल व्हावे लागले आहे
आपल्या पडत्या काळात
माणसाला शांत बसावे लागते
लोक म्हणतील ते ऎकून घ्यावे लागते
त्याप्रमाणेच आज मी ही शांत आहे
का काहीतरी करण्याची हिम्मत माझ्यात नाही?
पण एक सत्य मात्र आज
मी पूर्णपणे अनुभवलंय
स्वत: प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय
भाग्य आपल्याला सन्मुख होत नाही
आणि म्हणूनच त्या रंगीबेरंगी, प्रसन्न अशा
पहाटेची अन् सर्व दिशांवर ठसा उमटविणा-या
उगवत्या सूर्याची वाट पहाण्यात
आता काही अर्थ नाही, हा विचार
मनी रुजत चालला आहे
आणि राखेतून भरारी मारणा-या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे
मलाही नवे पंख फुटू लागले आहेत - सागर
No comments:
Post a Comment