Tuesday, October 9, 2007

सोनपरी

सोनपरीची स्वप्ने पाहता पाहता
बालपण उडून गेले
तो थोडा मोठा झाला...
सोनपरीची definition थोडी बदलली...
बालपणी हवे ते खेळणे देणारी सोनपरी
आता मनाला प्रेमाने झंकारणारी स्वप्नपरी झाली ..

तिला न उमगले हे
न कळले त्याच्या मनातील गुपित तिला ...
परि भेटी-गाठी त्यांच्या होतच असे नेहमीप्रमाणे ...
कधीतरी तिला उमगेल हे या आशेपोटी
दिवस जात होते
कसे तिला सांगावे यासाठी
तासन् तास चांदण्यांशी हितगुज होत असे.
स्वत:शीच बोलताना, हातवारे करताना
त्याला एक आगळेच समाधान लाभत असे...
स्वप्नांतील सोनपरीला propose करण्यासाठीचे ते नियोजन असे

अशीच वर्षे गेली...
तिचे लग्नही झाले...मूलही झाले...
तरी सोनपरीच्या विश्वातून त्याला बाहेर येता येत नव्हते...
शेवटी एकदा तो दिवस आला...
धीर करुन त्याने सोनपरीला विचारले,
प्रेम आहे माझे तुझ्यावर....होशील का माझी...
तुझ्याशिवाय मला जगणे अशक्य आहे...

सोनपरी मात्र सैरभैर झाली...
मनातच म्हणाली....वेड्या याच दिवसाची वाट पहात होते मी...
ती आनंदाची तेजस्वी झालेली भावना....एका क्षणातच विझून गेली...
काय करावे तिने...
दोन टोके समोर
एकीकडे स्वत:चा संसार.....
तर दुसरीकडे स्वप्नांतिल अवघाचि संसार ....
दोन टोके समांतर असती तर?????
ह्याच विचारात सोनपरी गढून गेली....
एका सोनपरीची प्रेमकथा विझून गेली....


तुम्ही मात्र जागे व्हा...आपल्या सोनपरीची प्रेमकथा जिवंत ठेवा....
- सागर

No comments: