Monday, May 27, 2013

Thursday, May 16, 2013

२ चारोळ्या : सहजच सुचलेल्या



लोभस हे डोळे

मनात उतरे
मुखचंद्र झाकोळे
अवघे विश्व सारे
- सागर


प्रीतमोहर मनी फुलला नि

लाल रंगात न्हाऊनि ह्या
केशसंभार उलगडला नि
विरघळून गेला मोहात ह्या
- सागर

Sunday, July 8, 2012

*** गॉड पार्टिकल्स ***

माझी नवी कविता :

*** गॉड पार्टिकल्स ***






Tuesday, May 15, 2012

प्रेमाचा अधिकार

प्रेमाचा अधिकार
कधी काळी होता
तेव्हा चूक केली
आणि फक्त पश्चातापच उरला
कर्तव्याचा संसार सुरु झाला पण,
विस्मरण झाले की
आता प्रेमाचा अधिकार
उरला नाही आपल्यापाशी
जपावे घरकुल
सांभाळावा संसार
तेच विश्व झाले माझे...
थोडेसे स्थिरावलो संसारात अन्
परत एकदा,
हृदयातील प्रेमाला एक कोवळा
अंकुर फुटला
नकळतच
तसेही प्रेम कोणी ठरवून करत नाही
पण हळू हळू
त्या प्रेमांकुराचे रोपटे झाले
अन्
एकदम भानावर आलो
हे काय करत आहोत आपण?
स्वतःलाच प्रश्न विचारला
हृदय नको म्हणत होते
पण मन घट्ट करणे आवश्यक होते
उखडले ते रोपटे
आणि भिरकावून दिले जनसागरात
आता ते रोपटे शिव्याशाप देत आहे
देणारच
का देऊ नये?
मोठ्या वृक्षाचे स्वप्न अस्तित्त्वात येण्याअगोदरच
एका प्रेमळ रोपट्याचा अंत झाला होता
उद्या दुसरी जमीन मिळेलही
त्या रोपट्याला
पण प्रेमाचा तो ओलावा?
तो कुठे मिळणार?
पाणी कुठेही मिळेल त्या रोपट्याला
पण त्या पाण्यातून मिळणारे प्रेम मात्र आटले
नव्हे आटवावे लागले
दुसरा पर्याय नव्हता
खरेच नव्हता....
काय करु मी तरी?
एकाच वेळी दोन स्वप्नांत कसा जगू?
कोणतेतरी एक स्वप्न खरे होणार ना?
दोन्ही स्वप्ने खरी होऊ शकतात का?
आजतरी मला हृदयावर दगड ठेवणे भाग आहे
परत एकदा प्रेमाचा अंकुर जन्म घेऊ नये
ही काळजी घेणे भाग आहे
नाहीतर एका घरकुलाच्या वृक्षाची
आहुती पडेल
स्वतःशीच बजावले
कर्तव्यापोटी मनाला समजावणे
हेच आता हाती उरले....
~सागर

Monday, March 12, 2012

हफ्ता (कविता)

सद्य परिस्थिती वर आधारित केलेला हा एक प्रयत्न.

लग्न झाले सगळे सेव्हींग संपले
फिरण्याकरता बाईकसाठी कर्ज घेतले
फ्लॅट बुक केला त्यासाठी कर्ज घेतले
पर्याय नसल्याने फर्निचरसाठी कर्ज घेतले

पगारातले पैसे एक तारखेलाच संपू लागले
उधारीचे जीवन महाग पडायला लागले
हफ्यांवर हफ्ते पगारातून कापले जाऊ लागले
कर्जफेड करताना हफ्त्यांचे गणित फिस्कटू लागले

वैतागाने सर्व बाजूंनी हृदयावर ताण पडू लागले
मोबाईल, लाईट, केबल, दूध, पेपर सर्वांची बिले
इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, वॉटर टॅक्सची बिले
हफ्त्यांमागून हफ्ते सारे खिशाला चटके देऊ लागले

शेवटी वाटू लागले आधीचे आयुष्य होते चांगले
त्यावे़ळी मनाचे समाधान तरी होते आपले
चार वर्षांत वैतागलो तरी सर्व होते चालले
अन् एक छोटे बाळ घरात आमच्या अवतरले

हॉटेलिंग, हिंडणे फिरणे, पिक्चर, सारे सारे थांबले
हफ्त्यांचे गणित जुळवण्यासाठी सुखाला चिमटे घेतले
त्या चिमुकल्याचे भविष्य घडवण्यासाठी सारे केले
तरी सुद्धा हफ्त्यांचे गणित जुळवणे नाही चुकले

Friday, March 2, 2012

एक चारोळी

आकाशातले तारे निखळताना,
मला मजा वाटत होती...
पण आभाळही फाटू शकते,
याची मात्र कल्पना नव्हती ...

Wednesday, November 30, 2011

सुखाची झोप

खलास झालो आज मी
परिस्थितीशी लढता लढता
हताश झालो आज मी
स्वप्नांना अग्नी देता देता

कष्ट केले, धन कमावले
तरी उरेना पुरवता पुरवता
ऋण काढले, सोहळे केले
आनंद विकत घेता घेता

पैसे कमावले, कर भरले
अपेक्षा परतीची ठेवता ठेवता
घर बांधले, व्याज भरले
नाकीनऊ आले ते फेडता फेडता

सुख हरवले, मन उदास झाले
रक्ताचा थेंब आटवता आटवता
भाग्य रुसले, नशीब फुटले
सुखी माणसाचा सदरा शोधता शोधता

वाटते आता, जुने दिवसच छान होते
शरीराच्या गरजा कमी होत्या
पोटभर अन्न आणि सुखाची झोप
याशिवाय दुसर्‍या चिंता नव्हत्या

~सागर

Thursday, June 23, 2011

नकार

आठवणींत तुझ्या झुरायला लागलो
विरघळून देखील उरायला लागलो


विखारी कटाक्ष तुझे दुर्लक्षिले अन्  
स्वप्नांत तुझ्या मी रमायला लागलो 


असह्य होऊन एक दिवस तू सुनावलेस अन् 
स्वप्नविश्वाच्या पायर्‍या मी उतरायला लागलो


मनास माझ्या कसेबसे समजावले अन् 
नकार तुझा मी पचवायला लागलो ...

झिडकारलेस रागावून मला तू अन् 
मग माझेच थडगे मी पुरायला लागलो


~सागर

Wednesday, June 22, 2011

थेंब...


थेंब न् थेंब पाण्याचा, जीवनात रस भरणारा 
थेंब न् थेंब घामाचा, कष्टात आनंद देणारा  


थेंब न् थेंब आसवाचा, दु:खात भार हलका करणारा 
थेंब न् थेंब आसवाचा, सुखात समाधान देणारा  


थेंब न् थेंब सागराचा, अगस्तीने पिऊनही उरणारा 
थेंब न् थेंब विषाचा, महादेवाने पिऊनही पचवणारा


थेंब न् थेंब अत्तराचा, सर्वत्र  सुगंध दरवळणारा 
थेंब न् थेंब मद्याचा, प्याल्यात असाच वाहून जाणारा 


थेंब न् थेंब 'सागराचा ' आता क्षणात विरुन जाणारा
मिटल्या पापणीतून ओघळण्या आधीच गोठून जाणारा


~सागर

Friday, June 10, 2011

नाशकात


पंचवटी तीर्थस्थान
विसरे लोकांचे भान
त्र्यंबकेश्वराला मान
नाशकात...
पडते पाऊल वाकडे
काळारामला साकडे
पांडवलेण्या आग्रा रोडकडे
नाशकात...



सावरकरांचे भगूर
बिटकोपासून थोडे दूर
भद्रकालीपासून फारच दूर
नाशकात.....
सीबीएसच्या एसट्या
कॉलेजरोडच्या पोरट्या
सोमेश्वरी भेटी चोरट्या
नाशकात...



सप्तश्रूंगी गड फार वर
मोहवून टाकी परिसर
भक्त चढे सरसर
नाशकात...
शालिमार गजबजलेला
शेअर रिक्षांनी भरलेला
मेनरोड खरेदीने फुललेला
नाशकात...
सातपूरच्या इंडस्ट्र्या
सिडकोच्या कॉलन्या
गोदावरीच्या वाहिन्या
नाशकात ...
ब्रह्मगिरीवर सुसाट वारा
आसमंत भन्नाट सारा
वेड लावी निसर्गाचा पसारा
नाशकात...
~सागर