Friday, June 10, 2011

नाशकात


पंचवटी तीर्थस्थान
विसरे लोकांचे भान
त्र्यंबकेश्वराला मान
नाशकात...
पडते पाऊल वाकडे
काळारामला साकडे
पांडवलेण्या आग्रा रोडकडे
नाशकात...



सावरकरांचे भगूर
बिटकोपासून थोडे दूर
भद्रकालीपासून फारच दूर
नाशकात.....
सीबीएसच्या एसट्या
कॉलेजरोडच्या पोरट्या
सोमेश्वरी भेटी चोरट्या
नाशकात...



सप्तश्रूंगी गड फार वर
मोहवून टाकी परिसर
भक्त चढे सरसर
नाशकात...
शालिमार गजबजलेला
शेअर रिक्षांनी भरलेला
मेनरोड खरेदीने फुललेला
नाशकात...
सातपूरच्या इंडस्ट्र्या
सिडकोच्या कॉलन्या
गोदावरीच्या वाहिन्या
नाशकात ...
ब्रह्मगिरीवर सुसाट वारा
आसमंत भन्नाट सारा
वेड लावी निसर्गाचा पसारा
नाशकात...
~सागर

2 comments:

mynac said...

सागर, खूपच मस्त... खरे तर कविता हा माझा प्रांत नसून हि........ ही कविता मात्र मला आवडली. छान

सागर said...

मनापासून धन्यवाद मयंक