Thursday, June 23, 2011

नकार

आठवणींत तुझ्या झुरायला लागलो
विरघळून देखील उरायला लागलो


विखारी कटाक्ष तुझे दुर्लक्षिले अन्  
स्वप्नांत तुझ्या मी रमायला लागलो 


असह्य होऊन एक दिवस तू सुनावलेस अन् 
स्वप्नविश्वाच्या पायर्‍या मी उतरायला लागलो


मनास माझ्या कसेबसे समजावले अन् 
नकार तुझा मी पचवायला लागलो ...

झिडकारलेस रागावून मला तू अन् 
मग माझेच थडगे मी पुरायला लागलो


~सागर

1 comment:

Unknown said...

आपला कविता - ब्लॉग मला आवडला. आपण कोणता font वापरता? मी कॉम्प्युटर मध्ये अर्धशिक्षित आहे म्हणा ना!