Wednesday, September 2, 2026

सव्यसाची..

 सव्यसाची...

एकदाच जरा उभा काय मी राहिलो आहे
कितीदा पडता पडता, सव्यसाची मी झालो आहे 

चुराडा होणाऱ्या त्या अपेक्षा मी बघत आलो आहे 
कोसळणाऱ्या मनाला सारखे मी सावरत आलो आहे 

हृदयावर झालेले घाव माझेच मी बघत आलो आहे 
ज्यांनी ते दिले त्यांच्यासमोरच हसत मी राहिलो आहे 

दिसणाऱ्या जखमांवर फुंकर मी सारखी घालतो आहे
पण रक्तबंबाळ मात्र मी मनाच्या आतून झालेलो आहे 

विसरून सर्व वेदना पुन्हा नवी सुरुवात मी करतो आहे 
आसवांच्या कोसळणाऱ्या धारांचा आडोसा मी घेतो आहे.
- सागर