Tuesday, October 9, 2007

मृगजळ

माझ्या जीवनाच्या रखरखीत वाळवंटात
तुझ्या रुपाने पाणी दिसले होते
तहान माझी अफाट होती जरी
तरी एका गोष्टीचे भान मला विसरायला झाले होते
तू म्हणजे माझी तहान भागवणारे
पाणी नसून एक मृगजळच आहेस

वाळवंटात पाण्यावाचून तडफडणारा देखील
समोर पाणी नाहिये हे
माहीत असूनही मृगजळामागे धावत असतो
तेच माझ्याबाबतीत घडू पाहतंय
तू माझी होणार नसलीस, तरीही
तुझी तहान लागलेला मी
तुझ्याऎवजी तुझ्या प्रतिबिंबावर - मृगजळावरच
समाधान मानून घेणार आहे

कारण मृगजळामागे धावता धावता
तहानेने व्याकुळ झालेल्याला
अचानक पाणी मिळून तो तृप्त होतो
कदाचित् तेच माझ्याबाबतीतही घडू शकेल ...
म्हणूनच मी या मृगजळामागे धावणार आहे....


- सागर

No comments: