Tuesday, August 4, 2026

धबधबा ...

 

धबधबा ...
एकटाच कोसळतो आहे
कोसळणे व्यर्थ आहे
याची जाणीवही आहे
तरीही कोसळणे त्याला भाग आहे
त्याच्या एकांताला उत्तर नाही
कोसळणे हा त्याचा स्वभाव आहे.
बांध बसला तर त्याचे तळे होते
डोंगरात योग्य जागा मिळाली तर
तो एका सुंदर रूपात बदलतो...
सर्वांना त्याचा , त्याच्या आनंदाचा
त्याच्या असण्याचाही हेवा वाटतो
आपण तसे नसल्याने पर्याय नसतो
त्यांच्याकडेही
असुयेने त्याचे सौंदर्य ते डोळ्यांनी
पिऊन घेतात.
धबधब्याला त्याच्याशी काय घेणे देणे?
तो मुक्त आनंदात कोसळत असतो
तोपर्यंत जोपर्यंत त्याच्या आयुष्यात
योग्य जागा आहेत...
धबधबा मुळात सुंदर नसतो.
त्याचे काम वाहणे आणि कोसळणे एवढेच असते...
त्याला सौंदर्य देण्याचे काम योग्य जागा...
योग्य वळणे देतात...
आनंद एकट्या धबधब्याचा नसतो..
त्या प्रत्येक वळणाचा ,
त्यासोबत केलेल्या प्रवासाचा देखील
तितकाच उत्कट आनंद असतो...
आपण ती वळणे आहात की नाही ?
हा खरा प्रश्न आहे...!!
- सागर 
(प्रकटन: ०५-ऑगस्ट-२०२५) 
 

No comments: