क्षितीजावर सूर्योदय होत असताना
त्याच्या तेजाने डोळे दिपत असताना
माणसाला कुठलेच भान राहात नाही
त्या तेजस्वी सूर्याकडे तो आवेगाने झेप घेतो
पण, झेप घेताना एक गोष्ट मात्र तो विसरतो
की, खाली अथांग सागर पसरलेला आहे
सागराच्या अथांगतेची त्याला जाणीव होते,
पण, तेव्हा खूप उशीर झालेला असतो
कारण तो आकाशातून सागराकडे वळालेला असतो
आणि थोड्याच वेळात त्याला त्याच्या
उगवत्या सूर्याच्या स्वप्नांबरोबर
जलसमाधी मिळते .... कायमची ....
- सागर [०२-११-१९९९]